Homeकला - क्रीडाजुना बुधवार, उत्तरेश्वर आणि खंडोबा विजयी

जुना बुधवार, उत्तरेश्वर आणि खंडोबा विजयी

कोल्हापूर :
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठने मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळवर ४-० गोलने तर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर २-१ने तसेच खंडोबा तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर २-१ गोलने विजय मिळवला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात जुना बुधवारने मर्दानी खेळाचा आखाडावर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. पूर्वार्धातील ४० मिनिटे गोलफलक कोराच राहिला. अखेर जादावेळेत सचिन मोरेने गोल नोंदवून जुना बुधवारला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात मयूर सुतारच्या पासवर संकेत कांबळेने ५८व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० अशी केली. ६१व्या मिनिटास देवराज जाधवने गोल नोंदवून आघाडी ३-० अशी भक्कम केली. एका चढाईत मर्दानी खेळाचा आखाड्याच्या गोलक्षेत्रात संदीप पोवारचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंचानी जुना बुधवारला पेनल्टी किक दिली. त्यावर मयूर सुतारने अचूक गोल नोंदवला.
मर्दानी खेळाचा आखाडाकडून अक्षय सरनाईक, निखिल साळोखे, पार्थ जाधव व  श्रेयश मरळकर यांनी गोलसाठी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी वाया गेल्या. अखेर पूर्णवेळेत ४-०ची आघाडी राखतच जुना बुधवारने विजय मिळवला. जुना बुधवारच्या मयूर सुतारला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
उत्तरेश्वरचा संध्यामठवर विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वरने संध्यामठवर २-१ने विजय मिळवला. १०व्या मिनिटाला अझर मोमीनने गोल नोंदवून उत्तरेश्वर संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर २२व्या मिनिटाला शेल्टॉन पॉल याने गोल नोंदवून आघाडी २-० अशी केली. उत्तरार्धात संध्यामठकडून श्रेयस नलवडेने ४६व्या मिनिटास गोल नोंदवून आघाडी २-१ वर आणली. अखेर उर्वरित वेळेत २-१ ची आघाडी राखून उत्तरेश्वरने सामना जिंकला. शेल्टॉन पॉल सामनावीर ठरला.
खंडोबाची फुलेवाडीवर मात…
सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात खंडोबाने फुलेवाडीवर २-१ ने मात केली. फुलेवाडीच्या शुभम देसाईने ३६व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्या गोलची परतफेड खंडोबाच्या विष्णू टी.एम.ने जादावेळेत (४६व्या मिनिटास) करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात शहीर सिद्दीक याने ५९व्या मिनिटाला गोल करून संघाला २-१ अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अखेर हिच आघाडी कायम राखून खंडोबाने विजय साकारला. खंडोबाच्या विष्णू मणिकंदमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
——————————————————-
  आजचे सामने…
• शिवाजी – रंकाळा : दुपारी २ वाजता
• पीटीएम – सुभाषनगर : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
28 °
78 %
3.1kmh
20 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular

You cannot copy content of this page