कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांनी नुकतीच लोणावळा येथे घेतलेल्या मॅच कमिशनरच्या लेखी व सराव परिक्षेत कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशनशी संलग्न कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे पंच राजेंद्र शिवाजी राऊत व सुनिल मधुकर पोवार हे उत्तीर्ण झाले.
राजेंद्र राऊत व सुनिल पोवार हे गेली २५ वर्षे पंच म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी कोल्हापूर, गडहिंग्लज, बेळगांव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगांव, अकोला, अमरावती, बीड, जालना, सोलापूर व लातूर येथील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी पंच म्हणून उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. तसेच सामना निरीक्षक म्हणून कोल्हापूर, सांगली, जळगांव, नांदेड, ठाणे, मुंबई, संभाजीनगर येथील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांसाठी कामकाज केलेले आहे.
राजेंद राऊत व सुनिल पोवार यांना केएसएचे पेट्रन्-इन्-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हा. प्रेसिडेंट, केएसएचे प्रेसिडेंट श्री. मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे महिला समिती सदस्या सौ. मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी व महाराष्ट्र रेफ्री बोर्ड सदस्य राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले. तर महाराष्ट्र रेफ्री बोर्डचे अध्यक्ष धनराज मोरे यांचे विशेष मार्गदर्शन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, सेक्रेटरी प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
राजेंद्र राऊत व सुनिल पोवार मॅच कमिशनर परिक्षा उत्तीर्ण
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2
°
C
31.2
°
31.2
°
62 %
5kmh
1 %
Mon
31
°
Tue
32
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°

