कोल्हापूर :
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लबने प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सलामी दिली. दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथे तर सुभाषनगरचा खेळाडू मुबारक नदाफ यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियमवर बुधवारी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
दरम्यान, स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, मंगलाताई साळोखे, आश्कीन आजरेकर, प्रसाद चव्हाण, केएसएचे ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते झाले. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेचे बाबासाहेब पाटील, दिगंबर फराकटे, अनिल निकम, सुशांत महाडिक, अक्षय केसरकर, महेश शिंदे, श्रीधर नलवडे, ओमकार काशिद व अनिकेत पाटील उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ संघादम्यान सामना झाला. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दिलबहारला मिळालेल्या पेनल्टी किकवर प्रथम भोसलेने गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. ६५व्या मिनिटाला १-० गोलची आघाडी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या चढाईत थांगलेन याला नियमबाह्य पद्धतीने रोखल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर प्रथम भोसलेने मारलेल्या फटक्यावर चेंडू वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणेने रोखून गोलचे संकट दूर केले. वेताळमाळकडून झालेल्या चढाईत थांगलेन याने दिलेल्या पासवर प्रेम देसाईने गोल नोंदवून जादावेळेत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये दिलबहारच्या डोंगेलचा फटका गोलरक्षक विशाल कुरणेने रोखला. त्यानंतर प्रथम भोसले, सतेज साळोखे, सार्थक मगदूम, माणिक पाटील यांनी अचूक गोल नोंदवले. वेताळमाळकडून पार्थ मोहिते व सर्वेश वाडकर यांनी गोल केले. त्यांच्या सिध्देश पंदारे व राहुल पाटील यांनी मारलेले फटके दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेने उत्कृष्टरित्या रोखून संघाला महत्वपूर्ण असा विजय मिळवून दिला. दिलबहारने हा सामना ४ विरूध्द २ गोलफरकाने जिंकून विजय साकारला.
सुभाषनगरचा दणदणीत विजय…
तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबने सुर्या फुटबॉल अकॅडमी, सातारा संघावर ८-० गोलने दणदणीत विजय मिळवला. सामना सुरु होताच पाचव्या मिनिटाला आर्यन पंदारेने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नितीन पोवारने ८व्या, प्रविण सुतार याने १५व्या, यश चव्हाणने २८व्या तर नितीन पोवारने ३४व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्धात मिळालेल्या ५-० गोलच्या आघाडीमुळे उत्तरार्धात सुभाषनगरच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. त्यामध्ये जावेद जमादारने ५३ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी ६-० अशी वाढवली. ६३व्या मिनिटाला प्रविण सुतारने गोल करून आघाडी ७-० अशी केली. त्यानंतर मुबारक नदाफने ६५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला ८-० गोलने दणदणीत विजय मिळवून दिला.
——————————
• सम्राटनगर – वर्षाविश्वास : सकाळी ७ वा.
• सांगली फु. क्लब – रंकाळा : दु. २ वाजता
• बालगोपाल – प्रॅक्टीस क्लब : दु. ४ वा.
दिलबहार आणि सुभाषनगरची विजयी सलामी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

