कोल्हापूर :
आशा ज्योती ग्रामीण उडान फाऊंडेशनतर्फे उत्तरप्रदेशातील उपधान, कुसरना (जि. केराकत) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान-गंगा : ग्रंथालय, अकॅडमी व वस्त्रोद्योग कौशल्य विकास केंद्र’ उभारण्यात येणार आहे. दीड एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ११ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्यासह हे केंद्र साकारणार आहे. या केंद्राचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (दि. २१) कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाला.
तरुणांचा उत्कर्ष व्हावा, त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी म्हणून उत्तरप्रदेश येथील जौनपूर जिल्ह्यातील कुसरना गावातील आशा ज्योती रूरल उडान फाउंडेशनच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ११ फूट अश्वारुढ पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानगंगा या नावाने असलेले ग्रंथालय, अकॅडमी, कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा निर्णय कुसरना येथील मुळचे कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी ग्रामस्थानी मोठ्या उत्साहात स्वागत करत ढोल ताशाच्या गजरात खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांची व्हिन्टेज कारमधून मिरवणूक काढली.
या शिक्षण संस्थेतून घडणारे विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षक, यशस्वी व्यावसायिक व्हावेत अशी अपेक्षा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केली. फाउंडेशनचे संस्थापक रवी उपाध्याय यांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रेमनाथ उपाध्याय, चंद्रकांत गांधी, महेश लढढा, श्याम शर्मा, विनोद दुल्हाणी, हिरा यादव, रामसूरत यादव, प्रमोदसिंह आदी उपस्थित होते.
——————————
छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान-गंगा केंद्राचे उत्तरप्रदेशातील उपधान येथे भूमिपूजन
Mumbai
light rain
28.4
°
C
28.4
°
28.4
°
82 %
8.3kmh
100 %
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°

