Homeकला - क्रीडाआंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर श्रीराम झा विजेता

आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर श्रीराम झा विजेता

 

• अनिकेत बापट उपविजेता तर निखिल दीक्षित तृतीय                                                             कोल्हापूर :
जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लब आयोजित तृतीय भाऊसाहेब देशपांडे स्मृती व पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर अग्रमानांकित आयुर्विमा महामंडळ दिल्लीचा ग्रँडमास्टर श्रीराम झा आठ गुण व पंचावन्न टायब्रेक गुण मिळवून विजेतेपद पटकाविले. ‌
श्रीराम झा ला रोख २१००० रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. तर अकरावा मानांकित साताऱ्याचा अनिकेत बापटने आठ गुण व साडेचोपन्न टायब्रेक गुण मिळवून उपविजेता ठरला. अनिकेतचा रोख १५००० रुपये व चषक देऊन गौरव केला. द्वितीय मानांकित पुण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षितने आठ गुण व साडेबावन्न टायब्रेक गुण मिळवत तृतीय स्थान निश्चित केले. निखिल ला रोख १०००० रुपये व चषक देऊन सन्मानित केले. तृतीय मानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेने आठ गुण व एकावन्न टायब्रेक गुणांसह चौथ्या स्थानी तर पुण्याचा श्लोक शरणार्थीचा साडेसात गुणासह पाचवा स्थानावर आला.
बक्षीस समारंभ इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनाचे प्रमुख सौ. श्रद्धा बडे, उद्योगपती व बुद्धिबळ संघटक प्रविण शहा, विझार्ड चेस क्बबच्या सौ. प्रतिमा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्रीपाद वैद्य, सौ. कुंदा वैद्य, अमोल देशपांडे, धीरज वैद्य, सुरज वैद्य, अमृता देशपांडे, अश्विनी वैद्य, अमृता वैद्य, प्रसाद कुलकर्णी, सौ. अस्मिता कुलकर्णी, सौ. दीपा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, पौर्णिमा उपळाविकर-माने, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, आरती मोदी, आदित्य आळतेकर व करण परीट यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विजय माने यांनी केले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सहा पटावर इलेक्ट्रॉनिक्स बुद्धिबळ पटाचा वापर करण्यात आला होता. त्याचे थेट आनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर पालक व प्रेक्षकांना एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती.
इतर विजेते पुढीलप्रमाणे आहेत.                                                                मुख्य बक्षिसे क्र.६) ओम लमकाने पुणे, ७) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर, ८) प्रथमेश शेर्ला पुणे, ९) प्रणव पाटील कोल्हापूर, १०) सोहम खासबारदार कोल्हापूर, ११) श्रीराज भोसले रेंदाळ, १२) सोहम दातार पुणे, १३)  आदित्य सावळकर कोल्हापूर, १४) मुदस्सर पटेल मिरज, १५) अभिषेक पाटील मिरज, १६)अपूर्व देशमुख सातारा, १७) रोहन ढोरे पुणे, १८) उमेश कुलकर्णी मुंबई, १९) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर, २०) रोहन पाथरकर पुणे, २१) सम्मेद पाटील इचलकरंजी, २२) सदानंद चोथे सांगली, २३) आर्या दिवम मध्यप्रदेश, २४) श्रीकांत मुचंडीकर पुणे, २५) संतोष सरीकर इस्लामपूर, २६) आदित्य आळतेकर कोल्हापूर, २७) हित बलदवा जयसिंगपूर, २८) संतोष कांबळे कोल्हापूर, २९) अंशुमन शेवडे बेळगाव, ३०) शंकर साळुंखे बार्शी.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.5 ° C
28.5 °
28.5 °
82 %
10.4kmh
100 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page