• तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल
कोल्हापूर :
मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेल्या भिमा कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांनी आणि शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर तेरावेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल, अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी झाली होती.
याचबरोबर शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय, मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा, ३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड, ३३ इंचाचा घोडा, एक टनाचा लाल कंधारी बैल, मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड, ११ किलोचा भोपळा, १० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहेत. तीन दिवसात शेतीसाठी आवश्यक साहित्याची नोंदणी झाली आहे. याचबरोबर शेती साहित्य, बी-बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे. तिसऱ्या दिवशी सुमारे १२ कोटींची उलाढाल झाली आहे.
सोमवारी (दि.१६) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता व बक्षीस वितरण समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धांतुडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती आहे. यावेळी माजी राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ. अशोकराव माने, आ. शिवाजीराव पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, माजी आ. संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
——————————
भिमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दीचा महापूर
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
26 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

