Homeशैक्षणिक - उद्योग जियोफायनान्स ॲपवर आता विविध बँका आणि NBFCच्या एफडी सुविधा उपलब्ध

जियोफायनान्स ॲपवर आता विविध बँका आणि NBFCच्या एफडी सुविधा उपलब्ध

कोल्हापूर :
जियोफायनान्स ॲपने आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध बँका आणि एनबीएफसींच्या फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सेवा सुरू केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही आणि ते एकाच ॲपवर विविध बँकांच्या एफडी योजनांची तुलना करून गुंतवणूक करू शकतील.
ॲपवर युनिटी स्मॉल फायनान्स बँक, सूर्यোদय स्मॉल फायनान्स बँक, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि महिंद्रा फायनान्स या संस्थांच्या एफडी सुविधा उपलब्ध आहेत. वापरकर्ते व्याजदरांच्या आधारे पर्याय फिल्टर करू शकतात. जियोफायनान्स ॲपवर वार्षिक ८.१५% पर्यंत व्याजदरांची ऑफर दिली जात आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया एंड-टू-एंड डिजिटल असून काही मिनिटांत एफडी बुक करता येते. तसेच एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून परतावा, मॅच्युरिटी तारीख आणि नूतनीकरण स्मरणपत्र यांची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे.
जियोफायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ सुरभे एस. शर्मा म्हणाले की, एफडी हा देशातील बचतीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. मात्र, विविध एफडी योजनांची तुलना करणे आणि गुंतवणुकीचा मागोवा ठेवणे ग्राहकांसाठी अनेकदा कठीण ठरते. जियोफायनान्स ॲपच्या माध्यमातून आम्ही संशोधन, तुलना, बुकिंग आणि ट्रॅकिंगची संपूर्ण प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि डिजिटल करत आहोत, जेणेकरून वापरकर्ते आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार अधिक चांगले निर्णय घेऊ शकतील.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
68 %
2.5kmh
9 %
Sun
30 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
30 °

Most Popular

You cannot copy content of this page