कोल्हापूर :
डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी विद्यार्थी व सध्या चंग आँग विद्यापीठ, दक्षिण कोरिया येथे कार्यरत असणारे संशोधक डॉ. नवनाथ पडळकर, डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरच्या संशोधक जयश्री शिंगाडे आणि किसन वीर महाविद्यालय, वाई येथील रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगावकर यांनी केलेल्या संशोधनाला युनायटेड किंगडम (युके) सरकारचे पेटंट मिळाले आहे. हे पेटंट सुपरकॅपॅसिटर उपकरणांसाठी लागणाऱ्या नॅनोपदार्थांच्या निर्मितीच्या नव्या व कार्यक्षम पद्धतीसाठी देण्यात आले आहे.
सध्या वापरात असलेल्या पारंपरिक बॅटऱ्यांना काही मर्यादा आहेत. त्या तुलनेत सुपरकॅपॅसिटर तंत्रज्ञान अधिक वेगाने चार्ज होणारे, जास्त काळ टिकणारे आणि अधिक शक्तिशाली असल्यामुळे ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाते. या संशोधनामध्ये विकसित करण्यात आलेली नॅनोपदार्थ तयार करण्याची पद्धत कमी खर्चाची, पर्यावरणास अनुकूल आणि अधिक कार्यक्षम आहे.
याबाबत डॉ. नवनाथ पडळकर म्हणाले की, ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात सुपरकॅपॅसिटर तंत्रज्ञानाला मोठे महत्त्व आहे. आम्ही विकसित केलेली नॅनोपदार्थ निर्मितीची ही नवी व कार्यक्षम पद्धत कमी खर्चात, अधिक कार्यक्षमता देणारी असून भविष्यातील स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानासाठी उपयुक्त ठरेल. युके सरकारकडून पेटंट मिळणे म्हणजे आमच्या संशोधनाच्या नाविन्यपूर्णतेला आणि जागतिक दर्जाला मिळालेली मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून भारतीय संशोधन जागतिक पातळीवर पोहोचत आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
डॉ. संदीप वाटेगावकर म्हणाले की, नॅनोतंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेली ही पद्धत भविष्यात औद्योगिक व व्यावसायिक वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या संशोधनामुळे सुपरकॅपॅसिटर उपकरणांची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. ग्रामीण व शहरी पातळीवर ऊर्जा उपायांसाठी हे संशोधन दिशादर्शक ठरेल.
भारतीय संशोधकांच्या संयुक्त प्रयत्नातून झालेले हे यश स्वच्छ व शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, भारतीय संशोधन जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे द्योतक आहे.
——————————
डॉ. पडळकर, शिंगाडे व डॉ. वाटेगावकर यांच्या संशोधनास युके सरकारचे पेटंट
RELATED ARTICLES
Mumbai
mist
27
°
C
27
°
27
°
74 %
2.1kmh
100 %
Fri
32
°
Sat
32
°
Sun
32
°
Mon
31
°
Tue
31
°

