Homeराजकियआज महापौर आणि उपमहापौर निवड

आज महापौर आणि उपमहापौर निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि.६) निवड होणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात महापौर व उपमहापौर निवडीची विशेष सभा होईल.
महापौरपदासाठी महायुतीकडून नवीन सभागृहातील भाजपकडून रुपाराणी संग्रामसिंह निकम तर उपमहापौरपदासाठी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेसकडून महापौरपदासाठी सचिन मारुती शेंडे तर उपमहापौरपदासाठी दुर्वास परशुराम कदम यांनी अर्ज दाखल केले.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे २६, शिवसेना शिंदे गट- १५, राष्ट्रवादी अजित पवार- ४ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीला
जनसुराज्यशक्ती पक्षाच्या एका नगरसेवकाने पाठिंबा दिल्याने त्यांचे एकूण संख्याबळ ४६ झाले आहे. काँग्रेस पक्षाचे ३४ तर शिवसेना उबाठा गट- १ असे कॉंग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ ३५ आहे. महायुतीचे संख्याबळ पाहता महायुतीचे महापौर व उपमहापौर निवडून येतील.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
80 %
1.5kmh
97 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page