Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदच्या ५२ विद्यार्थ्यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये निवड

विवेकानंदच्या ५२ विद्यार्थ्यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये निवड

विवेकानंदच्या ५२ विद्यार्थ्यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये निवड
कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयातील ५२ विद्यार्थ्यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीज, पुणे येथे निवड झाली आहे.
विवेकानंद महाविद्यालयातील सर्व शाखेच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन एन.एस.डी.सी. पोर्टलवर जी.टी.टी. पुणे व विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे टेलिफोनिक वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. यामधून ५२ विद्यार्थ्यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीज, पुणे येथे निवड झाली. यासाठी जी.टी.टी. पुणेचे प्रतिनिधी शिरीष टेमगीरे यांचे सहकार्य लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, डॉ. आशुतोष उपाध्ये, डॉ. अभिजीत कासारकर,  प्रा. वृषाली मिसाळ, प्रबंधक सचिन धनवडे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
60 %
0kmh
0 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
26 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page