कोल्हापूर :
जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडने भारतात ‘जिओब्लॅकरॉक पर्सनलाइज्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हाइज’ ही नवी सेवा सुरू केली आहे. हे एक डिजिटल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी प्लॅटफॉर्म असून, भारतीय नागरिकांना केवळ बचत करणारे नव्हे तर समजूतदार गुंतवणूकदार बनवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांची ५०:५० भागीदारी असलेली जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही संयुक्त उपक्रम कंपनी आहे.
याप्रसंगी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईशा एम. अंबानी यांनी सांगितले की, प्रत्येक भारतीयाची आर्थिक मजबुती देशाला ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. JioBlackRockचे उद्दिष्ट भारताला बचतकर्त्यांचा देशातून आत्मविश्वासी गुंतवणूकदारांचा देश बनवण्याचे आहे. जिओची व्यापक डिजिटल पोहोच आणि ब्लॅकरॉकचा जागतिक गुंतवणूक अनुभव यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जागतिक दर्जाचा गुंतवणूक सल्ला पोहोचवला जाईल.
या नव्या डिजिटल अॅडव्हायझरी सेवेंतर्गत गुंतवणूकदार केवळ ₹१०,००० पासून गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणूकदारांच्या उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेनुसार त्यांना वैयक्तिकृत गुंतवणूक योजना दिली जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या योजनांचे सातत्याने निरीक्षण केले जाईल, तसेच बाजारातील परिस्थितीनुसार वेळोवेळी री-बॅलन्सिंगचे सल्ले दिले जातील.
सामान्य गुंतवणूकदारांचा विचार करून या सेवेची किंमत ठरवण्यात आली आहे. वार्षिक शुल्क ₹३५० इतके ठेवण्यात आले असून, ₹१ लाखांपेक्षा जास्त अॅसेट्स अंडर अॅडव्हायझरी (AUA) असलेल्या गुंतवणुकीसाठी ०.३५ टक्के वार्षिक शुल्क आकारले जाईल. सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. आतापर्यंत वैयक्तिकृत गुंतवणूक सल्ला मुख्यतः उच्च-नेटवर्थ गुंतवणूकदारांपुरताच मर्यादित होता, कारण त्यामध्ये उच्च खर्च आणि रिलेशनशिप मॅनेजरवर आधारित मॉडेलचा समावेश होता. ही सेवा सध्या जिओफायनान्स अॅपवर उपलब्ध असून, लवकरच MyJio अॅपवरही सुरू केली जाणार आहे.
ब्लॅकरॉकचे सीओओ रॉब गोल्डस्टीन यांनी भारतातील गुंतवणूक सल्ल्यासाठी हा एक नवा मापदंड असल्याचे सांगत, Aladdin या संस्थात्मक दर्जाच्या रिस्क अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म आणि जिओच्या डिजिटल पोहोचीच्या माध्यमातून लाखो भारतीयांपर्यंत वैयक्तिक गुंतवणूक सल्ला पोहोचवला जाईल, असे नमूद केले. तर जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सचे सीईओ मार्क पिल्ग्रिम यांनी सांगितले की, भारताने आर्थिक समावेशनाच्या दिशेने मोठी प्रगती केली असून, आता पुढील टप्पा ‘वेल्थ इन्क्लूजन’चा आहे.
जिओ–ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सकडून ‘पर्सनलाइज्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हाइज’ सेवा सुरू
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.9
°
C
28.9
°
28.9
°
78 %
3.5kmh
16 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°

