कोल्हापूर :
भारतीय सेनादलाचे माजी सैनिक आणि जुन्या काळातील फुटबॉलपटू महादेव गुंडोपंत पाटील (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील ‘सिल्व्हर ब्रीच’ हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ‘हिल रायडर्स’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे ते वडील होत.
महादेव पाटील हे जुन्या काळातील एक नामवंत फुटबॉलपटू म्हणून ओळखले जात होते. कोल्हापूरच्या दिलबहार तालीम फुटबॉल संघाचे ते संस्थापक खेळाडू होते. खेळातील त्यांचे कौशल्य पाहून त्यांची निवड भारतीय सेनादलाच्या इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME) विभागात झाली. सेनादलात कार्यरत असताना त्यांनी सलग १५ वर्षे सैन्यदलाच्या फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धा गाजवल्या. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. माजी सैनिक संघटनेचे सचिव आणि बेकर्स सोसायटीचे खजिनदार म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. कोल्हापूरच्या हॉटेल व्यवसायातही त्यांचे मोठे नाव होते; ते ‘पर्णकुटी’ हॉटेलचे मालक होते.
पाटील कुटुंब हे खऱ्या अर्थाने फुटबॉलमय कुटुंब मानले जाते. महादेव पाटील यांनी स्वतःसोबतच आपल्या भावंडांमध्येही फुटबॉलची आवड निर्माण केली. त्यांचे धाकटे भाऊ नारायण पाटील, जयसिंग पाटील, श्रीकांत पाटील आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवाजी पाटील हे सर्वजण प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू म्हणून नावारूपास आले.
महादेव पाटील त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा मोठा परिवार आहे. ‘हिल रायडर्स’ संस्थेचे प्रमोद पाटील यांचे ते वडील होत. तसेच त्यांचे सुपुत्र संजय, दीपक आणि रणधीर हे पुण्यामध्ये हॉटेल व्यवसायात स्थिरावलेले आहेत.
माजी सैनिक आणि जुन्या काळातील फुटबॉलपटू महादेव पाटील यांचे निधन
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
7.3kmh
94 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

