• ६३ वर्षांत प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आणि विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या वाटचालीत एक नवा इतिहास रचला गेला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याच्या या घटनेचे उपस्थित सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि औचित्य या निमित्ताने नव्याने अधोरेखित झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात येणार असल्याने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आले. डॉ. जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. ध्वजवंदनानंतर प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी गुरव, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
शिवाजी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

