• प्रॅक्टीस क्लबचा रंकाळा तालीमवर विजय
कोल्हापूर :
चुरशीने झालेल्या सामन्यात पिछाडीवरून आघाडी घेत वेताळमाळ तालीम मंडळने सम्राटनगर स्पोर्ट्सवर २ विरूध्द १ गोलने मात केली. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने रंकाळा तालीम मंडळवर १-०ने विजय मिळवला.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. रविवारी वेताळमाळ आणि सम्राटनगर संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात सम्राटनगरकडून झालेल्या चढाईत वेताळमाळच्या गोलक्षेत्रात प्रेम देसाईचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर निरंजन कामतेने अचूक गोल केला. १९व्या मिनिटाला झालेल्या या गोलची परतफेड ३७व्या मिनिटास झाली. आकाश माळीच्या पासवर ऋतुराज सुर्यवंशीने गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
उत्तरार्धात गोलची आघाडी वाढवण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. सम्राटनगरच्या मोहित घोरपडेने मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक रणवीर खालकरने चेंडू बाहेर काढून गोलचे संकट टाळले. ओमकार जाधवच्या फ्रिकिकवर सोहम साळोखेने गोलची सोपी संधी दवडली. ओमकारने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. वेताळमाळकडून आकाश माळी, मितेई, राहूल पाटील, आकाश मोरे यांनी खोलवर चाली रचल्या. त्यामध्ये ६२व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. राहुल पाटीलने दिलेल्या पासवर आकाश माळीने गोल करून संघाला महत्वपूर्ण २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आकाश माळीने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी वाया गेली. संदेश पंदारे गोलची संधी गमावली. अखेर उर्वरित वेळेत २-१ची आघाडी राखतच वेताळमाळने सामना जिंकला.
प्रॅक्टीस क्लब विजयी…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामना प्रॅक्टीस क्लब आणि रंकाळा तालीम यांच्यात झाला. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात ४६व्या मिनिटाला अजिंक्य नलवडेने गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. पूर्णवेळेत हिच १-०ची आघाडी राखून प्रॅक्टीस क्लबने विजयावर शिक्कामोर्तब केले. रंकाळा तालीमकडून गोलसाठी झालेल्या चढायांना यश आले नाही.
——————————
वेताळमाळची सम्राटनगरवर मात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

