कोल्हापूर :
रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक श्री. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व उदाहरणासह अधोरेखित केले. नवीन रुजू झालेले सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील नियमावली, वाहन चालवताना पाळावयाची शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

