कोल्हापूर :
क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन २०२६) दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये महासैनिक दरबार हॉल ग्राऊंड येथे आयोजित केले आहे. प्रदर्शन ४ दिवस सकाळी १० ते ८ या कालावधीत चालू राहणार आहे. प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचे काम वेगात सुरू असल्याची माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व दालन २०२६ चे चेअरमन महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दालन प्रदर्शनाबाबत के.पी. खोत म्हणाले की, सन १९९२ मध्ये बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. आताचे हे १३वे दालन आहे. या दालनचे उदघाटन दि. ३० जानेवारी सकाळी ११ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री यांच्या हस्ते व वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडीक, आमदार चंद्रदिप नरके, प्रफुल्ल तावरे अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल तावरे व उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता कोल्हापूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रो. एम .जी.गाडगीळ यांचा टेक्निकल सेमिनारचा कार्यक्रम आयोजित केला आहे. १ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता केमिकल इंजिनिअर अच्युत गोडबोले यांचे टेक्निकल सेमिनार आयोजित केले आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या दालन ला भेट देऊन संवाद साधणार आहेत. १ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व महानगरपालिका आयुक्त प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे.
महेश यादव यांनी सांगितले की, या दालनमध्ये १७० स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे. नुकतेच कोल्हापूर सांगली सातारा, सोलापूर, सिधुदूर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन झाले आहे. त्यामुळे वकील, पक्षकार व तेथील जनतेचा कोल्हापूरकडे ओघ वाढत आहे. या प्रदर्शनामुळे त्यांना कोल्हापूरात गुंतवणूकीस संधी मिळणार आहे. तसेच कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन प्रकल्प, तंत्रज्ञान बांधकाम विषयक साहित्य, अर्थसहाय्य करणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली मिळणार असून ग्राहकांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरणार असून या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही एक स्मरणिका काढणार आहोत.
पत्रकार परिषदेला क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे, सह समन्वयक पवन जामदार, सह सचिव शौर्य मगदूम, सहखजानिस लव पटेल आदी उपस्थित होते.
——————————
क्रिडाई कोल्हापूर आयोजित दालन प्रदर्शन शुक्रवारपासून
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

