Homeशैक्षणिक - उद्योग मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांना आत्मसन्मान व नवी उर्जा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा

मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांना आत्मसन्मान व नवी उर्जा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा

• डी. वाय. पाटील ग्रुपमधील २३० विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणरी ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ ही गुणवंत विद्यार्थ्याला मिळणारी केवळ आर्थिक मदत नसून, ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करेल, त्यांना नवी उर्जा व प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन डीएमआयएचईआरचे प्रो-चॅन्सलर व चीफ अ‍ॅडव्हायझर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. सौ.शांतादेवी डी. पाटील (आईसाहेब) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात २३० विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’चे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. मिश्रा बोलत होते.
यावेळी पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून आईसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाल डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका सौ. राजश्री काकडे, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्कॉलरशिपबद्दल सविस्तर माहिती देऊन भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली.
डॉ. संजय डी.पाटील म्हणाले की,  गुणवत्ता पूर्ण शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, नवनवे अभ्यासक्रम व संशोधन यावर आमचा विशेष भर आहे. तळसंदे येथील या कॅम्पसमध्ये ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत. सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील याची खात्री आहे.
यावेळी वैजयंती संजय पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, भारत चव्हाण पाटील, श्वेता पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता,   डॉ. पी. बी. साबळे, डॉ. भालबा विभुते, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, मानसिंगराव पाटील, देवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. मारुती देवकर यांनी केले. कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी आभार मानले.
           ———
पुढील १५ वर्षाचा रोड-मॅप सादर…
विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून तळसंदे विद्यापीठाचा पुढील १५ वर्षाचा मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी याबाबत प्रेझेन्टेशनद्वारे माहिती दिली. त्यानुसार विद्यापीठाचा विस्तार आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखा होणार असून जागतिक दर्जाच्या सुविधा येथे देण्यात येणार आहेत. सुमारे सॊळा हजारहून अधिक विद्यार्थी या विद्यापीठात उच्च शिक्षण घेतील याचा रोड-मॅप यावेळी दाखविण्यात आला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page