Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. अनिता तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी निवड

डॉ. अनिता तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी निवड

कोल्हापूर :
सांगरूळ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील मेनलँड फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड झाली आहे.
हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, समाजातील अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरलेला अभिमानाचा क्षण आहे. शैक्षणिक वारसा नसलेल्या सामान्य कुटुंबातून येऊन आणि ग्रामीण भागात राहून जिद्दीने शिक्षण पूर्ण करुन तिने हे यश मिळविले आहे. डॉ. अनिता यांचे वडील कुंडलिक तावडे हे विवेकानंद कॉलेजचे कर्मचारी आहेत.
डॉ. अनिता तावडे यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे ही नामांकित आंतरराष्ट्रीय संधी मिळवली आहे. चीनच्या प्रतिष्ठित विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल फेलोशिप मिळणे ही कोल्हापूर जिल्ह्यातील संशोधकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे स्थानिक स्तरावर शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नव्या प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. अनिता तावडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगरुळ हायस्कूल येथे झाले असून ज्युनिअर सायन्सचे शिक्षण डी. सी. नरके महाविद्यालय येथे झाले आहे. बी.एस्सी. व एम.एस्सी. पीएच.डी (नॅनो टेक्नॉलॉजी) चे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाले आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठातील डॉ. तायडे व डॉ. शर्मा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.6 ° C
28.6 °
28.6 °
79 %
7.7kmh
95 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page