कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालय इमारती समोरील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. दत्ताजीराव कदम यांना यांच्या पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी व विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास संचालक अमर बाबाजी यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले.
तसेच याप्रसंगी दत्त तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, रेणुका भक्त मंडळ शिरोळचे अध्यक्ष दिलीप माने, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, दादासो पाटील, संतोष जाधव, पंकज गुरव, विकास कांबळे यांनी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक अरुण कुमार देसाई, अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, दरगु माने गावडे, ज्योती कुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजीत पाटील, रणजीत कदम, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर खान मिस्त्री, कामगार संचालक प्रदीप बनगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयटीआयचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग, पदाधिकारी तसेच डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँक व दत्त भंडार ग्राहक संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्व.माजी आमदार डॉ. सा.रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
8kmh
99 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

