Homeइतरगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने पुष्प प्रदर्शन

गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने पुष्प प्रदर्शन

• ६ व ७ डिसेंबरला महावीर उद्यान येथे प्रदर्शन
कोल्हापूर :
गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५वे पुष्प प्रदर्शन दि. ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने तसेच बगीचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स असतील, अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पल्लवी कुलकर्णी, सचिव सुप्रिया भस्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांतादेवी. डी. पाटील, प्राजक्ता चरणे, सुभाषचंद्र अथणे, शशिकांत कदम, रवींद्र साळुंखे, डॉ. रचना संपत कुमार आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाविषयी अधिक माहिती अशी, या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे, सांगली, बेळगाव अशा शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य जसे कुंड्या, स्टॅन्ड, रोपे, कंद, खते, हत्यारे वगैरे बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. प्रदर्शनाची सुरुवात शनिवारी (दि.६) सकाळी ७ वाजता पुष्प स्पर्धेने होईल. ज्यामध्ये स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. तज्ञ परीक्षकांकडून त्याचे परीक्षण होईल व त्यानंतर पुष्प प्रदर्शनाचा उदघाटन समारंभ सकाळी १०:३० वाजता होईल. उद्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी परितोष कंकाळ अध्यक्षस्थानी असतील तर विशेष अतिथी म्हणून सत्यजित कदम, राजेंद्र दोशी, शांतादेवी डी. पाटील हे उपस्थित असतील.
संध्याकाळच्या सत्रात ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा घेण्यात येईल. यानंतर तरुणांच्या कल्पनांचा आविष्कार दाखविणाऱ्या बोटॅनिकल फॅशन शो सादर होईल. यवेळी सिनेतारिका जुई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (दि. ७) सकाळी चित्रकला स्पर्धा होतील. याचा बक्षीस समारंभ एचपी हॉस्पिटॅलिटि इंडस्ट्रीजचे सौ. व श्री. हिराकांत पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. संध्याकाळी ‘पृथ्वी आणि पर्यावरण’ या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येतील. प्रदर्शनामध्ये गार्डन्स क्लब आणि इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लॉवर फेस्टिवल या संकल्पनेअंतर्गत सृजनशील प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक म्हणून बॉम्बे ओहारा चाप्टरच्या तज्ञ मार्गदर्शकांची टीम लाभणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने अत्तरे तयार करणे, फुलांपासून सरबते तयार करणे, तसेच कागदी फुले तयार करणे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामची यावर्षीची संकल्पना ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ यावर आधारित रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाप अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
30 ° C
30 °
30 °
74 %
3.6kmh
40 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page