Homeराजकिययुवासेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुखपदी सुहास देसाई

युवासेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुखपदी सुहास देसाई

कोल्हापूर :
युवासेना (शिंदे गट) जिल्हा कार्यकारणी निवड नुकतीच पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी सुहास देसाई यांची निवड करण्यात आली.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख खा. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवासेना सचिव किरण साळी यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी सुहास देसाई यांची निवड करण्यात आली.
युवासेनेच्या माध्यमातून युवकांच्या विविध प्रश्नांसाठी सुहास देसाई यांनी आवाज उठवला आहे. त्यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघात युवकांवर मजबूत पकड आहे. या निवडीवेळी युवासेना (शिंदे गट) कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळी, ठाणे शाखाप्रमुख रमेश भोसले, कुणाल भोईटे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29.4 ° C
29.4 °
29.4 °
76 %
5.9kmh
34 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page