कोल्हापूर :
महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांतील खेळ गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करीत असते. महावितरणच्या १६ परिमंडलातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात. यंदा अमरावती येथे नुकत्याच झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर परिमंडळाने सहभाग घेतला होता. या चार दिवसांच्या स्पर्धेत महावितरण कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १० सुवर्ण व १२ रौप्य अशी एकूण २२ पदकांची लयलुट केली. त्याबद्दल कौतुक सोहळा सोमवारी (दि.२४) रोजी पार पडला. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्य अभियंता काटकर स्वप्नील म्हणाले की, कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंनी महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सादर केलेली ही उल्लेखनीय कामगिरी परिमंडलासाठी अभिमानाची बाब आहे. क्रिकेट संघाने सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावून परिमंडलाचे नाव उंचावले आहे. सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये १० सुवर्ण व १२ रौप्य पदकांची कमाई करून कोल्हापूर परिमंडलाच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा भक्कम ठसा उमटवला. या यशामुळे कोल्हापूर परिमंडलाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजक कोल्हापूर परिमंडल असून जनरल चँम्पियनशिप कोल्हापूर परिमंडलच घेईल, असा विश्वास कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केला. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) पुनम रोकडे यांच्यासह सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते अजित अस्वले, सुधाकर जाधव, संगणक प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) आप्पासाहेब पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले उपस्थिती होते. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी केली तर आभार सुरज बल्लाळ यांनी मानले.
कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंचे उल्लेखनीय यश पुढीलप्रमाणे आहे. सांघिक खेळ : क्रिकेट- विजेता, खो-खो- पुरुष (उपविजेता), कॅरम- महिला (उपविजेता), टेनिक्वाईट- महिला (उपविजेता).
वैयक्तिक खेळ : विजेता खेळाडू – कुस्ती – ७४ किलो- गुरुप्रसाद देसाई, ७९ किलो- संदीप सावंत, थाळी फेक- पुरुष गट- इम्रान मुजावर, महिला गट- ज्योती कांबळे, गोळा फेक – महिला गट – पूजा ऐनापुरे, भाला फेक – महिला गट – अश्विनी जाधव, टेनिक्वाईट- महिला एकेरी – पुजा ऐनापुरे, शरीरसौष्ठव – ९० किलो- प्रविण घुणके, ८० किलो- राहुल कांबळे.
उपविजेता खेळाडू – ८०० मीटर धावणे- पुरुष गट – वैभव माने, उंच उडी – पुरुष गट- सतीश पाटील, महिला गट- अश्विनी देसाई, कॅरम- महिला गट- विजया माळी, कुस्ती- ९७ किलो- हणमंत कदम, शरीरसौष्ठव – ६५ किलो- शिवम चौगुले, ७० किलो- अमित पाटील, पॉवर लिफ्टिंग- ७४ किलो- सागर जगताप, बॅडमिंटन – पुरुष एकेरी- इम्रान तासगावकर.
महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाची कामगिरी कौतुकास्पद
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
1.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°

