• डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालय स्पर्धा
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने तर मुलींमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी संघाने विजेतेपद पटकावले.
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे शनिवारी (दि.२२) या स्पर्धा संपन्न झाल्या. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थी विकास संचालक डॉ. अद्वैत राठोड, उपकुलसचिव संजय जाधव, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. जगनाथ शेटे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व कॉलेजचे क्रीडाप्रमुख व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत मुलांचे सहा संघ व मुलींचे पाच अशा एकूण ११ संघाचा सहभाग होता. मुलांच्या गटात डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर मुलींमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघाने उपविजेतेपद मिळवले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
——————————————————-
मेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
haze
34
°
C
34
°
31.9
°
55 %
5.7kmh
40 %
Sun
32
°
Mon
29
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
29
°

