• सचिवपदी निरंजन गोडबोले यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाच्या डॉ. परिणय फुके यांची, तर मानद सचिवपदी पुण्याच्या निरंजन गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जळगाव येथील जैन हिल्स येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ॲड. चंद्रशेखर जामदार यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२८ या कालावधीसाठी ही निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये ११ पदांपैकी १० पदांवर बिनविरोध निवड झाली आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या ए. के. रायझदा यांच्या देखरेखेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. ग्रँडमास्टर विदीत गुजराथी, महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन आणि ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आणि महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे हे संघटनेमध्ये खेळाडू प्रतिनिधी म्हणून काम करतील.
नवीन कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – डॉ. परिणय फुके (गोंदिया), कार्यकारी अध्यक्ष – सिद्धार्थ मयूर (जळगाव), मानद सचिव – निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार – भरत चौगले (कोल्हापूर), उपाध्यक्ष – सुनील रायसोनी (नागपूर), उपाध्यक्ष – श्रीराम खरे (रत्नागिरी), उपाध्यक्ष – चिदंबर कोटीभास्कर (सांगली), सहसचिव – अश्विन मुसळे (चंद्रपूर), सहसचिव – दीपक तांडेल (ठाणे),
सहसचिव – सतीश ठाकूर (जालना).
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. परिणय फुके
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
54 %
3.6kmh
1 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

