कोल्हापूर :
विद्यार्थ्यांनी कठिण परिस्थितीत योग्य व सोपे काय आहे, याचा विचार करुन निर्णय घ्यावा. असा निर्णय घेता आला तर विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात यश मिळू शकते. चांगल्या सवयी, काटेकोर नियम, सुलभ शिस्त व नियमितता हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. यशाचा सिध्दांत ठेवून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, असे मत व्याख्याते विक्रांत उरुणकर यांनी मांडले.
विवेकानंद कॉलेजच्या ज्युनि.आर्टस कॉमर्स विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या एज्युकेशनल फेअर कार्यक्रम अंतर्गत व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत उरुणकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनि.आर्टस कॉमर्स विभागप्रमुख प्रा.सौ. शिल्पा भोसले या होत्या.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा.सौ. शिल्पा भोसले यांनी केले. आभार प्रा. बी. एस. कोळी यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. सौ. एस. पी. वेदांते व प्रा.अश्विनी गायकवाड यांनी केले. यावेळी ज्युनिअर विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

|
|