कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करावेत असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले होते. त्याअनुषंगाने प्रभाग क्रमांक ७ मधील सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपा उत्तरेश्वर मंडल अध्यक्ष सुनील पाटील यांनी पक्षाकडे अर्ज केला आहे.
सुनील पाटील यांनी याआधी बुथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर उपाध्यक्ष, भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील असतात. विरोधी पक्ष म्हणून तीन वर्ष युवा मोर्चामध्ये काम करत असताना युवकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये असणारा सक्रीय सहभाग व सामाजिक कार्याच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपा प्रदेश महाराष्ट्रच्यावतीने प्राप्त झालेले विहित नमुन्यामधील अर्ज भरून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याकडे रीतसर मागणी अर्ज केला.
उत्तरेश्वर मंडल अध्यक्ष सुनील पाटील यांचा भाजपाकडे उमेदवारीसाठी मागणी अर्ज
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

