कोल्हापूर :
के.एस.ए. जिम्नॅस्टिक्स् प्रशिक्षण वर्गातील १३ खेळाडूंची राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स् स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू अर्टिस्टिक्स् व रिदमिक प्रकारा अंतर्गत खेळणार आहेत. १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे स्पर्धा होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यावतीने शांतीनिकेतन विद्यापीठ माधवनगर सांगली येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक्स् स्पर्धेमधून या १३ खेळाडूंची निवड झालेली आहे.
अर्टिस्टिक्स् जिम्नॅस्टिक्स् प्रकारासाठी श्रेया घनशाम काटवे, अनया अभिनंदन शेटे, हर्षदा निवास पाटील, परिणीती अमोल सरूडकर, कादंबरी राकेश जाधव, अनुष्का अमित काशीद आणि मयुरेश उत्तम माने यांची निवड झाली आहे.
रिदमिक जिम्नॅस्टिक्स् प्रकारासाठी प्रणिती नितीन पंडीतराव, स्वरा संदीप पाटील, देवीना यतीन जनवाडकर, एदिता विवेक अजरी, रितीका निशिकांत नाईक, काव्या प्रविण जाधव यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक व केएसए जिम्नॅस्टिक्स सेक्रेटरी दिग्विजय राजेभोसले यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
खेळाडूंना केएसएचे पेट्रन-इन्-चीफ् खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, श्री संभाजीराजे छत्रपती, केएसएचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती व पेट्रन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच केएसएचे जिम्नॅस्टिक्स कोच संजय तोरस्कर, असि. कोच तेजस्विनी वेटाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
केएसए जिम्नॅस्टिक्स् प्रशिक्षण वर्गातील १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.1
°
C
30.1
°
30.1
°
73 %
5.8kmh
14 %
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

