कोल्हापूर :
महायुती सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या जनतेच्या कामाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आला.
तसेच शिवसेनेच्या जिल्हासमन्वयक पदी निवड झाल्याबद्दल विनायकराव साळोखे, शहर संघटकपदी निवड झाल्याबद्दल हर्षल सुर्वे, कसबा बावडा शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कृष्णा लोंढे, कसबा बावडा शहर संघटकपदी निवड झाल्याबद्दल आदर्श जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास ठेवून जनतेने माहितीचे २३२ आमदार निवडून दिले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हापुरातील अनेक माजी नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात माजी नगरसेवक आणि विविध समित्यांचे माजी अध्यक्ष तसेच कोल्हापूर शहरातील मान्यवरानी पक्ष प्रवेश केला आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी मंजूर करून आणत विकासकामे सुरू आहेत. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम शिवसेना आणि शिवसैनिक कार्यरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन आलेल्या सर्वांना सोबत घेऊन तसेच कुठल्याही जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ न देता, ताकतीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख रणजीत जाधव, कमलाकर जगदाळे, रमेश खाडे, किशोर घाटगे, दिपक चव्हाण, सुनिल जाधव, अजय इंगवले, नेपोलीयन सोनुले, दुर्गेश लिंग्रस, विवेक महाडिक, रणधीर महाडिक, अजित मोरे, रमेश पोवार, सुभाष मोरे, राजू हुंबे, रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, मृदुला पुरेकर, प्रविण लिमकर, प्रसाद उगवे, रमेश भोसले, स्मिता माळी, रामचंद्र भाले, रवींद्र साळोखे, अंकुश निपाणीकर, अर्जुन आंबी, सुरेश माने, प्रभू गायकवाड, किरण पाटील, श्रीकांत मंडलिक, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवणारच : आ. राजेश क्षीरसागर
Mumbai
smoke
29
°
C
29
°
26.9
°
34 %
4.1kmh
3 %
Tue
28
°
Wed
27
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

