Homeकला - क्रीडाकोल्हापूरच्या कलाकारांची निर्मिती असलेला 'प्रलय' चित्रपट शुक्रवारपासून 

कोल्हापूरच्या कलाकारांची निर्मिती असलेला ‘प्रलय’ चित्रपट शुक्रवारपासून 

कोल्हापूर :
कशीश प्रोडक्शन निर्मित ‘प्रलय’ हा मराठी चित्रपट शुक्रवार (दि.३१) पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर शहरात रॉयल आणि आयनॅक्स रिलायन्स मॉल येथे हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती ‘प्रलय’ चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदुराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘प्रलय’ चित्रपटाचे निर्माते सरदार आवळे आणि सह-निर्मात्या सौ. ज्योती सरदार आवळे आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे असून, दिग्दर्शन सचिन तुकाराम वारके यांनी केले आहे. छायाचित्रकार म्हणून अभिषेक शेटे यांनी काम पाहिलं आहे. चित्रपटाची कथा हिरालाल कुराणे यांची तर पटकथा-संवाद, गीते आणि नृत्यदिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. अन्य गीते बळवंत आतिग्रे यांनी लिहिली आहेत. चित्रपट सामाजिक विषयावर आधारित आहे.
जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर अत्याचार होतो, तेव्हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करताना तो आपल्या सिस्टीमद्वारे दबला जातो. त्याला न्याय मिळत नाही तेव्हा त्यांकडे दोनच पर्याय शिल्लक असतात एक म्हणजे या सिस्टमच्या दबावाखाली चिरडून मरायचं नाही तर उठायचं एक प्रलय बनून..! असाच एक प्रश्न ‘प्रलय’ हा चित्रपट घेऊन येतोय..!
‘प्रलय’ या चित्रपटात जेष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, आदित्य कुंभार, संतोष कसबे, आयुब इंगळीकर, उमेश बोळके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे, प्रभाकर वर्तक, तुषार कुडाळकर, सचिन मोरे, शिवाजी पाटील, दीपक खटावकर, विजयन्त शिंदे, पारस सोळंकी, समीर पंडितराव, ओम वेसनेकर या कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, सुवर्णा काळे यांचाही विशेष सहभाग या चित्रपटात आहे.
या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन आदित्य कुंभार आणि नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. संकलन शेखर गुरव यांचे असून, कला दिग्दर्शन अनुकूल सुतार यांचे आहे. संगीत संयोजन ऐश्वर्य मालगावे यांनी केले आहे, तर पार्श्वसंगीत शशांक पवार यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
80 %
8.7kmh
39 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page