Homeकला - क्रीडाधनश्री पाटीलची हॅटट्रिक अन् कोल्हापूर संघ उपांत्य फेरीत

धनश्री पाटीलची हॅटट्रिक अन् कोल्हापूर संघ उपांत्य फेरीत

कोल्हापूर :
धनश्री पाटीलने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर केएसए कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर गर्ल्स फुटबॉल संघाने नाशिक जिल्हा फुटबॉल संघावर ४ विरुध्द १ गोलने विजय मिळवला. या विजयासह केएसए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. गुरुवारी (दि.३०) सकाळी ९:३० वाजता केएसए कोल्हापूर जिल्हा संघाचा पुणे जिल्हा संघाबरोबर सामना होईल.
शिरपूर-धुळे येथे महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनिअर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. आज कोल्हापूर जिल्हा संघ आणि नाशिक जिल्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. यामध्ये कोल्हापूर संघाने जोरदार खेळाचे प्रदर्शन करत विजयाला गवसणी घातली. या सामन्यात धनश्री पाटीलने फ्रिकिकवर ६व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर धनश्रीने ३५ आणि ४० व्या मिनिटाला अनुक्रमे सही नलवडे व आर्या कांबळे यांच्या पासवर गोल नोंदवत हॅटट्रिक साधली. तसेच समीक्षा चौगुलेने ४८व्या मिनिटाला सही नलवडेच्या पासवर गोल केला. दरम्यान, नाशिक संघाकडून सामन्याच्या १९व्या मिनिटाला गोल करून आघाडी कमी केली. अशाप्रकारे ४-१ने सामना जिंकून केएसए कोल्हापूर संघाने उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात आघाडीफळीत सई नलवडे, मध्यफळीत आर्या कांबळे, श्रद्धा पाटील व बचावफळीत सई बोंडगे, देवयानी पाटील, युगंधरा पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. तसेच गोलकीपर जानवी पाटीलने भक्कमपणे गोलरक्षण करून संघाची गोलची आघाडी कायम ठेवण्यात मोलाचे सहकार्य केले. संघ प्रशिक्षक रघु पाटील व शलाका जामदार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
3 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page