कोल्हापूर :
कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत आयोजित शिवाजी विद्यापीठ विभागीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटर फ्लाय व २०० मी ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या अजयराज जाधव याने तृतीय स्थान मिळवले आहे. या यशामुळे आंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे या स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी देवचंद कॉलेज अर्जुननगर, डीकेटीइ इचलकरंजी, घाळी कॉलेज गडहिंग्लज, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर, शाहू कॉलेज, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे आदी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये २०० मी बटर फ्लाय व २०० मी ब्रेस्ट स्ट्रोक या खेळ प्रकारात डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमधील विद्युत अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला अजयराज जाधव याने तिसरा क्रमांक मिळवत राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी पात्र झाला. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतिश पावसकर यांनी अजयराज जाधव आणि जिमखाना प्रमुख विनोद उतळे यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.
‘डी. वाय’च्या अजयराज जाधवची आंतर विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
haze
29
°
C
29
°
29
°
65 %
2.1kmh
40 %
Wed
29
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
31
°
Sun
31
°

