Homeकला - क्रीडाकेएसए कोल्हापूर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ शिरपूरला रवाना

केएसए कोल्हापूर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ शिरपूरला रवाना

कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजीत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर-धुळे येथे होत आहेत. या स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ रवाना झाला आहे. संघाचा थेट उपांत्यपूर्व फेरीत समावेश असून सामना बुधवारी (दि.२९) आहे.
के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर दि.१२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत कमला कॉलेज येथे घेण्यात आले. केएसए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसाार डी-लायसन्स प्रशिक्षक रघु पाटील, अमित शिंत्रे, शलाका गवळी यांनी १५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला.
या संघास केएसएचे पेट्रन- इन्‌‍- चीफ् खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, श्री संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे व केएसए फुटबॉल समितीचे सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.
केएसए कोल्हापूर संघ असा : गोलकिपर- जान्हवी रविंद्र पाटील व सृष्टी सुर्यदिप माने, खेळाडू- देवयानी दिलीप पाटील, युगंधरा प्रमोद पाटील, सई प्रकाश बोंडगे, प्रिती रावसाहेब पाटील, आर्या गणेश माळी, श्रद्धा विजयकुमार पाटील, आर्या विनायक कांबळे, सिद्धी कृष्णात हवालदार, धनश्री सुनिल पाटील, सानिका नंदकुमार पाटील, नेहा बाबासो गिरीगोसावी, अमरीन आयाज शेख, समिक्षा संजय चौगुले, क्षमिका सागर माने, योगिता सागर पोवार, सई सचिन नलवडे, प्रेरणा परशुराम माने, वीरा राजू सांगलीकर. या संघाचे प्रशिक्षक म्हणून सी लायसन्स प्रशिक्षक शलाका गवळी व डी लायसन्स प्रशिक्षक रघु पाटील हे कामकाज पाहणार आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.7 ° C
28.7 °
28.7 °
77 %
6.3kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page