कोल्हापूर :
केएसएचे राष्ट्रीय फुटबॉल पंच अजिंक्य प्रकाश गुजर यांची सब-ज्युनियर बॉईज टीयर-१ राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी मॅच ऑफिशियल म्हणून तर महिला फुटबॉल पंच सिध्दी शेळके यांची महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी मॅच ऑफिशियल म्हणून नियुक्ती झाली आहे.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित सब-ज्युनियर बॉईज टीयर-१ नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप पंजाब येथील अमृतसर येथे दि. २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होत आहे. या चॅम्पियनशीपसाठी के.एस.ए.चे राष्ट्रीय पंच अजिंक्य प्रकाश गुजर यांची नियुक्ती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने करण्यात आलेली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर-धुळे येथे दि. २६ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होत आहेत. या स्पर्धेसाठी के.एस.ए.च्या महिला पंच सिध्दी रविंद्र शेळके यांची नियुक्ती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्यावतीने करण्यात आलेली आहे.
अजिंक्य गुजर आणि सिध्दी शेळके यांना केएसएचे पेट्रन्-इन्-चीफ खासदार श्री शाहू छत्रपती महाराज व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हा. प्रेसिडेंट, केएसएचे प्रेसिडेंट श्री. मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे महिला समिती सदस्या सौ.मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी व महाराष्ट्र रेफ्री बोर्ड सदस्य राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले. महाराष्ट्र रेफ्री बोर्डचे अध्यक्ष धनराज मोरे यांचे विशेष मार्गदर्शन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, सेक्रेटरी प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
फुटबॉल पंच अजिंक्य गुजर व सिध्दी शेळके यांची मॅच ऑफिशियल म्हणून निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
7.3kmh
94 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

