Homeराजकियसहकारामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी : मंत्री हसन मुश्रीफ

सहकारामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर :
ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यामध्ये सहकाराचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीतून मार्गक्रमण करत असताना बानगे येथे उभारलेली जयहिंद सेवा संस्थेची इमारत संचालक मंडळाच्या चिकाटी आणि सचोटीमुळेच शक्य झाली आहे. या संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
बानगे (ता. कागल) येथे जयहिंद विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा तसेच जय भवानी तालीम कुस्ती संकुलाच्या वस्तीगृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार के. पी. पाटील, सुरेशआण्णा हिरेमठ महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शेती आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यामध्ये विकास सेवा संस्था या मातृसंस्था आहेत. त्यामुळे शेतकरी आणि सेवा संस्थांमधील साखळी अधिक मजबूत होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी)च्या माध्यमातून सेवा संस्थाना सहकार्य करु.
यावेळी आमदार श्री. कटके, आमदार श्री. घोरपडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बिद्रीचे साखर कारखाना उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, बिद्रीचे संचालक के. ना. पाटील, आर. व्ही. पाटील, रणजीत मुडूकशिवाले, माजी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील – म्हाकवेकर, ॲड. दत्ताजीराव राणे, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड. जीवनराव शिंदे, दत्ता पाटील – केनवडेकर, उमेश पाटील, बाळासाहेब चौगुले, अमर पाटील, संतोष पाटील, राजू पाटील संस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी संतराम पाटील यांनी स्वागत केले. राजू पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. धनाजी पाटील यांनी आभार मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
29.9 °
17 %
3.6kmh
1 %
Wed
34 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page