कोल्हापूर :
त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ई अँड टी सी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील १३ नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी पुणे), एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे आणि व्हीआयटी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता. या कठीण आणि स्पर्धात्मक परिक्षेत एसजीआयचा संघ एकमेव असा ठरला, ज्यांनी कॅन सॅटेलाइटचे पॅराशूट उड्डाण व डेटा नोंदणी (डेटा लॉगिंग) यशस्वीपणे पूर्ण केले. या उल्लेखनीय कार्यगौरवामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूट (एसजीआय)चा मान राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.
यशस्वी विद्यार्थी झैद मोमिन, आदर्श सूर्यवंशी, गणेश पाटील, इशिका इंगळे, श्रुती साळुंखे आणि मिसबह अत्तर यांनी परिश्रम, नवोन्मेष आणि संघभावनेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, ईअँडटीसी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका आर. एम. मुल्ला, इन्स्टिट्यूटच्या सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
69 %
2.6kmh
20 %
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
26
°
Tue
27
°

