• जिओ गोल्डवर २% मोफत सोने आणि ₹१० लाखांपर्यंत बक्षिसे जिंकण्याची संधी
कोल्हापूर :
धनतेरस आणि दिवाळीच्या निमित्ताने जिओ फायनान्सने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली yआहे. “Jio Gold 24K Days” या मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत, जिओ फायनान्स २% मोफत सोने देत आहे. धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही खास ऑफर JioFinance आणि MyJio अॅपवर उपलब्ध असून, ग्राहकांना निश्चित रिवॉर्ड्ससोबतच ₹१० लाखांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, आता सोने खरेदीसाठी लांब रांगा लावण्याची किंवा शुभ मुहूर्ताची वाट पाहण्याची गरज नाही. ग्राहक आता अॅपच्या माध्यमातून घरबसल्या सोने खरेदी करू शकतात.
१८ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ₹२,००० किंवा त्याहून अधिक मूल्याचे डिजिटल सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २% मोफत सोने मिळेल, जे ७२ तासांच्या आत त्यांच्या गोल्ड वॉलेटमध्ये जमा होईल. तसेच ₹२०,००० किंवा त्याहून अधिक मूल्याचे सोने खरेदी करणारे ग्राहक “Jio Gold Mega Prize Draw” मध्ये सहभागी होतील. या ड्रॉमध्ये एकूण ₹१० लाखांच्या बक्षिसांमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, सोन्याची नाणी, मिक्सर-ग्राइंडर आणि गिफ्ट व्हाउचर्स यांचा समावेश आहे. भाग्यशाली विजेत्यांची घोषणा २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केली जाईल.
जिओ फायनान्सची धनतेरस आणि दिवाळी ऑफर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

