कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालय मराठी विभाग एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठच्या परिपत्रकानुसार संविधानातील उद्देशिका, मूलभूत अधिकार व कर्तव्य यांचे वाचन विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार असे म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थीप्रेमी, उत्तम वाचक होते. त्यांचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता वाचनाकडे वळावे. वाचाल तर वाचाल असा संदेश देत त्यांनी वाचनाचे असणारे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले. बीए भाग तीन ची विद्यार्थिनी श्रावणी अडसूळ हिने मनोगत व्यक्त केले. सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी आभार मानले. एनसीसी प्रमुख प्रा. मेजर सुनिता भोसले, प्रा.रोहिणी रेळेकर व ग्रंथालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
45 %
3.1kmh
0 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

