कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून आपली स्वायतत्ता सांभाळत आले आहे. परीक्षा हा कॉलेजचा आत्मा असल्याने प्रश्नपत्रिका तयार करणे आणि वेळोवेळी नव्या संकल्पनांचा वापर करुन सुधारीत मॉडेल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नेहमीच कॉलेजचा परीक्षा विभाग करताना दिसतो. त्यासाठी ब्लुम टेक्सोनॉमी संकल्पनेचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे स्वरुप असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले.
ते अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि परीक्षा विभाग आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रश्नपत्रिका तयार करण्यातील मुख्य संकल्पना आणि मार्गदर्शन याविषयावर बोलत होते. या शिबिराचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले होते.
प्रश्नपत्रिका शिबीराचे मुख्य अतिथी डॉ. उत्तम जाधव (डिन स्कूल ऑफ लिबरल आर्टस, डायरेक्टर, सेंटर ऑफ ॲडव्हान्स लर्निंग अँड टिचिंग, संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे) यांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ब्लुम टेक्सोनॉमी ही पध्दत किती उपयुक्त आणि योग्य आहे, याचे मार्गदर्शन करताना (menti.com) च्या माध्यमातून ब्लुम टेक्सोनॉमीचा वापर करुन प्रश्नपत्रिका तयार करता येतात. प्रश्न कसे तयार करता येतात. विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाच्या अनुषंगाने प्रश्नांचा स्तर कसा ठरविला जातो याचे प्रशिक्षण दिले. ब्लुम टेक्सोनॉमी ही पध्दत वापरुन उत्तम नमुना प्रश्नपत्रिका तयार करण्याबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबीराची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. जे नवाथे यांनी केले. आभार डॉ. सुप्रिया पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. माधुरी पवार यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
प्रश्नपत्रिका तयार करण्याची उत्तम पध्दत ब्लुम टेक्सोनॉमी : डॉ. उत्तम जाधव
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
45 %
3.1kmh
0 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

