Homeकला - क्रीडाएमसीए महिला क्रिकेट पंच परीक्षेत कोल्हापूरच्या योगीता रेडेकर उत्तीर्ण

एमसीए महिला क्रिकेट पंच परीक्षेत कोल्हापूरच्या योगीता रेडेकर उत्तीर्ण

कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए), पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या महिला क्रिकेट पंच परिक्षेत कोल्हापूरच्या योगीता रेडेकर हिने यश संपादन केले. योगीता रेडेकर हीे केडीसीए सिनीयर महिला क्रिकेट संघाची खेळाडू आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महिला क्रिकेट पंच कार्यशाळेचे सप्टेंबरमध्ये पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी महाराष्ट्रातील ६० महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेतील सहभागी महाराष्ट्रातील सर्व महिला पंचाची प्रथम लेखी परिक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये पुणे येथे घेण्यात आली. यामधील उत्तीर्ण महिला पंचांची एमसीएच्या गंहुजे स्टेडियम, पुणे येथे प्रॅक्टीकल व तोंडी परिक्षा घेण्यात आली. त्यामधून अंतीम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूरातील योगीता रेडेकर हिने यश संपादन केले. पंच परीक्षा उत्तीर्ण होणारी ती कोल्हापुरातील दुसरी महिला पंच आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
69 %
5.9kmh
13 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page