Homeकला - क्रीडायतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची विनू मंकड स्पर्धेसाठी निवड

यतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची विनू मंकड स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू यतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची १९ वर्षाखालील विनू मंकड एकदिवशीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा एकदिवशीय साखळी पध्दतीची असून या स्पर्धेतील सामने दि ९ ते १७ ऑक्टोबरपर्यंत रांची येथे होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ई ग्रुमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र बरोबर उत्तरप्रदेश, दिल्ली, आसाम, राजस्थान व पंजाब या संघांचा समावेश आहे. पहिला सामना ९ ऑक्टोबरला उत्तरप्रदेश संघाबरोबर, दुसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्ली बरोबर, तिसरा सामना १३ ऑक्टोबरला आसाम बरोबर, चौथा सामना १५ ऑक्टोबरला राजस्थान संघाबरोबर व पाचवा सामाना १७ ऑक्टोबर रोजी पंजाब संघाबरोबर रांची येथे होणार आहे. बाद फेरीे, उपांत्य फेरी व अंतिम सामने राजकोट येथे २५ ते ३० ऑक्टोबरपर्यंत होतील.
यतीराज पाटोळेची सन २०२२-२३ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात व सन २०२२-२३, २०२३-२४ या सलग दोन वर्षी महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघाच्या कॅम्पसाठी निवड झाली होती.
अभिषेक आंब्रेची यापुर्वी महाराष्ट्र 1श१४ वर्षाखालील व १६ वर्षाखालील संघाच्या कॅम्पसाठी निवड झाली होती. अभिषेक आंब्रेला यावर्षी प्रथमच १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात संधी मिळाली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
61 %
0kmh
0 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page