• केंद्र कार्यालयाकडून थेट संस्थांच्या चालू खात्यांवर डिव्हीडंड वर्ग
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद संस्थांना २८ कोटी, ७५ लाख रुपये डिव्हीडंड अदा केला आहे. शेअर्स रकमेच्या दहा टक्केप्रमाणे हा डिव्हिडंड वर्ग केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांमधील एकूण १३,२१० सभासद सहकारी संस्थांना हा डिव्हीडंड वर्ग करण्यात आला. यामध्ये सहकारी साखर कारखाने, प्राथमिक विकास सेवा संस्था, सहकारी दूध संस्था, सहकारी पतसंस्था सहकारी, सहकारी अर्बन बँका, सहकारी सूत गिरण्या, सहकारी पाणीपुरवठा संस्था, सहकारी पत संस्था इत्यादी प्रकारच्या संस्था केडीसीसी बँकेच्या सभासद आहेत. शेअर्स भागधारणा पूर्ण केलेल्या सभासद संस्थांना दहा टक्केनुसार हा डिव्हीडंड वर्ग केला आहे. संस्थांच्या बँक चालू खात्यांवर केंद्र कार्यालयाकडूनच थेट हा डिव्हीडंड वर्ग केला आहे. दरम्यान; ३१ मार्च २०२५ अखेर बँकेकडे या संस्थांचे एकूण शेअर भांडवल ३०७ कोटी रुपये आहे.
केडीसीमार्फत सभासद संस्थांना २८ कोटी, ७५ लाख रुपये डिव्हीडंड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
25.9
°
36 %
4.6kmh
20 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

