Homeशैक्षणिक - उद्योग कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवस उत्साहात

कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवस उत्साहात

• रक्तदान शिबिरात २०० रक्तबाटल्यांचे संकलन
कोल्हापूर :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. यानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर आणि बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित या रक्तदान शिबीराचे उदघाटन कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कौस्तुभ गावडे म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्यामुळे एखाद्यास जीवदान तर मिळतेच पण एका सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधानही मिळते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष हितेंद्र साळुंखे म्हणाले की, बॉम्बे ब्लड ग्रुप हा दुर्मिळ रक्तगट असून गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळविण्यासाठी ९९७००१८००१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिराचे आयोजन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत पतसंस्थेचे संचालक सुहास पाटील यांनी केले तर आभार विनोद पन्हाळकर यांनी मानले.
शिबिराचे आयोजन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन याठिकाणी करण्यात आले. यावेळी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर संघटनेचे विक्रम यादव, किर्ती कांबळे, सूरज देशमुख, ज्योती माने, नयुब मोमीन, सुहास पाटील आणि नर्सिंग स्टाफ यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व संचालक व स्टाफ, मुरलीधर गावडे, सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य पी. एम. हाके, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य विरेन भिर्डी, एनसीसी प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले, लेप्टनंट जितेंद्र भरमगोंडा, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील उपस्थित होते. या शिबिरात संस्था परिसरातील गुरुदेव कार्यकर्ते, आजी-माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी रक्तदान केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29 ° C
29 °
28.9 °
26 %
2.6kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page