Homeशैक्षणिक - उद्योग जागतिक वैज्ञानिकांच्या यादीत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक

जागतिक वैज्ञानिकांच्या यादीत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक

• प्रा. डॉ. लोखंडे, प्रा. डॉ. पाटील आणि प्रा. डॉ. गुंजकर यांचा समावेश
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांनी जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने २०२५ साठी ही यादी नुकतीच जाहीर केली आहे.
या यादीमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता आणि संशोधन संचालक प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, प्रा. डॉ. उमाकांत पाटील आणि प्रा. डॉ. जयवंत गुंजकर यांचा समावेश आहे. मटेरियल सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय संशोधन योगदानामुळे त्यांना ही जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून दरवर्षी  ‘जगातील टॉप २% वैज्ञानिक’ यादी जाहीर केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त यादी विविध शैक्षणिक शाखांतील अग्रगण्य वैज्ञानिकांची निवड करते. संशोधनातील एकूण संदर्भ, सहलेखक समायोजित इंडेक्स, संमिश्र संदर्भ गुण आदी निकषांवर ही निवड केली जाते.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी तिघांचेही अभिनंदन केले आहे. डॉ. पाटील म्हणाले, ही आंतरराष्ट्रीय मान्यता संशोधनातील आमच्या उत्कृष्टतेच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. विद्यापीठात सुरु असलेले वैज्ञानिक नवोपक्रम आणि संशोधन यांचा जागतिक पातळीवर झालेला हा गौरव अभिमानास्पद आहे.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी  यांनी डॉ. लोखंडे, डॉ. पाटील व डॉ. गुंजकर यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
29.9 °
17 %
3.6kmh
1 %
Wed
34 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page