Homeशैक्षणिक - उद्योग सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

कोल्हापूर :
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयसिंगपूर येथील डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि. जयसिंगपूर यांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या वतीने सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करण्यात आले.
सन २०२४-२५ मध्ये बँकेने केलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निकष व सूचनांचे तंतोतंत पालन करून व्यवसाय वाढीबद्दल, तसेच ग्राहकांना दिलेली उत्कृष्ट सेवा व बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल रुपये २५१ ते ५०० कोटी पर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमधून सर्वोत्कृष्ट बँक म्हणून दिला जाणारा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन निपुण कोरे यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन महेंद्र बागे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जनार्दन महादेव बोटे, चीफ जनरल मॅनेजर विनायक कदम, डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश दर्जे, असिस्टंट जनरल मॅनेजर मिलिंद जगदाळे, मनीष पुजारी व सर्व पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला.
डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँकेने सर्वसामान्य सभासदांचे हित लक्षात घेऊन त्यांना विविध प्रकारच्या कर्ज पुरवठ्यासह आधुनिक तंत्रज्ञान दिले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात २० शाखांच्या माध्यमातून आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सभासदांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. पारदर्शी व्यवहार आणि सभासदांच्या पाठबळावरच बँकेने हे यश मिळवले आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे सर्व संचालक, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे व जिल्ह्यातील सर्व सदस्य, विविध बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
33 %
4.6kmh
0 %
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page