कोल्हापूर :
कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार’ यावर्षी प्रा. स्वाती महेश कोरी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी दिली. यावेळी प्रा. डॉ. दिग्विजय पवार, श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, विलास पाटील, पांडुरंग माळी उपस्थित होते.
ते म्हणाले की, पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल, कोल्हापुरी फेटा व रोख ५००० रुपये असे आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन (मिनी हॉल) येथे होणार आहे. प्रा. स्वाती कोरी या दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टच्या सचिवपदी कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्या गडहिंग्लज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.
तसेच पवार ट्रस्टचे संस्थापक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित “राजर्षी शाहू महाराजः संक्षिप्त चरित्र” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिरपूरकर असणार आहेत.
कार्यक्रमासाठी तहसिलदार विजय पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधा जयसिंगराव पवार, श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी दिली.
प्रा. स्वाती कोरी यांना ‘पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
Mumbai
light rain
29
°
C
29
°
28.9
°
79 %
5.7kmh
94 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

