Homeसण - उत्सवआर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे महाचंडी होमसह विविध कार्यक्रम

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे महाचंडी होमसह विविध कार्यक्रम

• २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार होम, पूजा व सांस्कृतिक कार्यक्रम
कोल्हापूर :
श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची संलग्न संस्था वैदिक धर्म संस्थान, कोल्हापूर च्यावतीने शरद नवरात्रोत्सवामध्ये महाचंडी होमसह विविध होम, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सकाळी आठ पासून आयर्विन मल्टीपर्पज हॉल, गवत मंडई, शाहूपुरी कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती समन्वयक दिव्या चंदवानी आणि आशिष चंदवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, शरद नवरात्री उत्सवाचे हे १८वे वर्ष आहे. यावर्षी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत श्री महागणपती होम, नवग्रह होम, सुब्रमण्यम होम, वास्तू होम, श्री महालक्ष्मी होम, सुदर्शन होम, रुद्र होम व शतचंडी होम हे सर्व होम आणि विधी स्वामी अच्युत यांच्या उपस्थितीत होत आहेत. बेंगळूरूस्थित वेद विज्ञान महाविद्यापीठातील प्रशिक्षित पंडित आणि सहकारी हे विधी करणार आहेत.
दि. २८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता श्री महागणपती होमपासून सुरवात होऊन श्री सुब्रमण्यम होम, वास्तू होम आणि नवग्रह होम होतील. सायंकाळी ५:३० वाजता महा सुदर्शन होम आणि श्री महालक्ष्मी होम होतील. सुदर्शन होमामध्ये साधक सुदर्शन क्रिया करतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रास दांडिया होईल.
दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता रुद्र पूजा आणि रुद्र होम तर सायंकाळी ५:३० वाजता महाचंडी कलश स्थापना आणि चंडी पारायण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. ३० रोजी सकाळी ७:३० वाजता महाचंडी होम होईल. यामध्ये गो पूजा, १०८ कन्या पूजन, सुहासिनी पूजन आणि दांपत्य पूजन असते.
यावेळी दैनंदिक सत्संग होणार असून महाप्रसादाची सोय आहे. हे सर्व होम आणि विधी सर्वांसाठी खुले असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक दिव्या आणि आशिष चंदवानी यांनी केले बाहे. या पत्रकार परिषदेला डिंपल गजवानी, डॉ. अनिमा दहीभाते, समीर बखले, प्रणव लोले, अजय किल्लेदार, राजेंद्र लकडे व अजिंक्य पाडगांवकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page