कोल्हापूर :
अश्विन शुद्ध चतुर्थीला श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्रीमातंगी माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात दररोज देवीच्या सालंकृत पूजा बांधल्या जातात. गुरुवारी चौथ्या दिवशी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्रीमातंगी माता’ रुपातील पूजा श्रीपूजक पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उदगावकर, संतोष जोशी व अवधूत गोरंबेकर यांनी बांधली.
‘महाविद्या श्रीमातंगी माता’ या पूजेचे आधार लेखन वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी यांनी केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. पूजेचे स्वरूप असे – श्यामवर्णी, तीन नेत्र असलेली, माथ्यावर चंद्र धारण केलेली, चार हातांमध्ये भक्तांच्या शत्रूनाशासाठी अंकुश आणि तलवार, पाश आणि ढाल धारण केलेल्या रत्नालंकारांनी युक्त अशा दयावंत, सर्वसिद्धि देणाऱ्या मातंगीला माझा मनापासून नमस्कार आहे.
भगवान शिव हे मतंग असून, त्यांनी त्रिपुरीची उपासना केली असता, त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली, किंवा (कल्पभेदाने) मतंगॠषींच्या कन्येच्या रुपात हिने अवतार घेतल्याने हिला ‘मातंगी’ म्हणतात. हि नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिची उत्पती वैशाख शुद्ध तृतीयेस आहे.
या देवीचे लघुश्यामा, उच्छिष्टमातंगी, राजमातंगी, सुमुखी, संमोहिनी, चंडमातंगी, वश्यमातंगी, कर्णमातंगी, तैलमातंगी इ. प्रकार व उपासना भेद आहेत
श्री अंबाबाईची ‘महाविद्या श्रीमातंगी माता’ रुपात पूजा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

