कोल्हापूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वदेशी वस्तू वापरा’ असा संकल्प व्यापाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी बुधवारी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवा याविषयी आवाहन आणि विनंती करण्यात आली.
खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महाद्वार परिसरातील दुकानांमध्ये जाऊन व्यापारांना प्रत्यक्ष भेटून स्वदेशी अभियानाचा संकल्प यशस्वी करण्याचे आवाहन केले. जीएसटी कपातीमुळे झाली मोठी बचत, प्रत्येक घरी स्वदेशी-घरोघरी स्वदेशी अशा आशयाचे फलक दुकान मालकांना दिले. त्याचबरोबर ग्राहकांना देखील स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची विनंती करण्यात आली. भाजपा नेत्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, मोदिजींचा संकल्प यशस्वी करण्याची ग्वाही व्यापारांनी दिली.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल चिकोडे, अशोक देसाई, विराज चिखलीकर, राजू मोरे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, विजय खाडे, डॉ. राजवर्धन, संतोष भिवटे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, गणेश देसाई, माधुरी नकाते, किरण नकाते, भरत काळे, हेमंत कांदेकर, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, विश्वजीत पवार, सयाजी आळवेकर, आशिष ढवळे, सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, दिलीप पोवार, अवधूत भाटे, अभिषेक बोंद्रे, संतोष माळी, महेश यादव, अशोक लोहार, राहुल लायकर, बंकट सूर्यवंशी, प्रग्नेश हमलाई, धीरज पाटील, नजीर देसाई, गणेश चिले, रवींद्र घाडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-
आत्मनिर्भर भारतासाठी भाजपा कोल्हापूरचा ‘स्वदेशीचा जागर’
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
42 %
4.6kmh
5 %
Thu
29
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

