श्री अंबाबाईची ‘महाविद्या श्री बगला माता’ रुपात पूजा
कोल्हापूर :
शारदीय नवरात्रौत्सवात दुसऱ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्री बगला माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी चार ते रात्री आठ पर्यंत १,१८,४१७ इतक्या भाविकांनी दर्शन घेतले.
साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात देवीच्या सालंकृत पूजा बांधल्या जातात. मंगळवारी दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्री बगला माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपुजक अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी व नितिन सांगवडेकर यांनी बांधली.
‘महाविद्या श्री बगला माता’ रुपातील पूजेसंबंधीची माहिती अशी दिली आहे. –
स्वरूप : अमृत समुद्रामधील, मणिमंडपाच्या, रत्नखचित वेदावरील, सिंहासनावर बसलेली पीतवर्णाची, पिवळी वस्त्रे व अलंकार धारण केलेली, एकहाती शत्रूची जीभ व एकहाती गदा धारण केलेल्या देवीला मी नमन करतो.
इतिहास : एकदा सत्ययुगात सकल ब्रह्मांडात मोठे वादळ, उत्पात माजले, तेव्हा हे अरिष्ट थांबण्यासाठी भगवान विष्णूंनी, सौराष्ट्रातील हरिततीर्थाकाठी श्रीदेवीची उपासना केली असता, श्रीविष्णूंच्या तपतेजापासून चैत्रशुद्ध अष्टमीस हिचा उद्भव झाला. ही आठवी महाविद्या असून, मृत्युंजय हा हिचा सदाशिव आहे. ही श्रीकुलातील देवता, दाक्षिणाम्नायपीठस्था आहे.
उपासना भेद : बडवामुखी, जटावेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहद्भानु इत्यादी नावांनी ओळखली जाते आणि तिची पूजा केली जाते. तिची पूजा दोन भुजा आणि चार भुजांच्या स्वरूपात केली जात असे. ——————————————————-
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

