• श्री दत्त साखर कारखान्याने राबविलेल्या ‘श्री दत्त पॅटर्न’ची घेतली माहिती
कोल्हापूर :
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांनी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी राजेश टोपे यांनी कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात ‘श्री दत्त पॅटर्न’ची माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचेकडून कारखाना कार्यस्थळावर घेतली. गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपडमुक्तीसाठीचे फायदे, त्याची यशोगाथा, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी माहिती दिली.
श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपडी मुळे झालेले नुकसान, श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेले काम, सुमारे चार हजार एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन, जमीन क्षारपड मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश, त्याचे फायदे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत ११ कोटी ४६ लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न, आगामी काळात क्षारपड मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा, दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगितता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न, अशा विविध बाबींवर माहिती दिली. त्यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला.
कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपड कमी करून, शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे व उत्पादनक्षमता वाढवणे हा आहे. जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी घालवाड येथे प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे, कीर्तीवर्धन मरजे, मयुरभाई, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.
माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
30
°
39 %
5.1kmh
0 %
Fri
30
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
29
°

